Name of Book : भारताचा राजकीय परिसर

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 324

Synopsis :
आशिया व प्रशांत महासागर विभागाच्या समाजविकासविषयक विभागाचा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय समाज कल्याण संघटनेत व सल्लागार म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात बरीच वर्षे काम करीत असताना या भागातील पंचेचाळीस देशातील नेते, त्यांचे धोरण समजावून घेता आले. त्या देशातील विकासाचे कार्यक्रम जवळून पाहायला मिळाले. काही देशात सल्लागार म्हणून काम केल्यामुळे तेथील जेष्ठ नेत्यांशी परिचय, स्नेह जमला. यामुळे घरात केंव्हाही स्वागत होईल अशी जवळीक साधली गेली. यातील अनेक मंडळी आमच्या घरी येत-जात असत. सहज बोलताबोलता त्या देशाची संस्कृती, तत्वज्ञान, ईश्वरविषयक कल्पना, समाजरचना, कुटूंबपध्दती, ग्रामीण विकास, देशापुढचे आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय प्रश्न यांची ओळख होई. देशातल्या नेतृत्वाच्या स्तरावरील व्यक्तींशी मन मोकळे बोलणे झाल्यामुळे थोड्या अवधीतसुध्दा त्या त्या देशाची चांगली ओळख होई. काही देशात सल्लागार राहील्यामुळे, प्रत्यक्ष कार्यानुभवातून प्रश्न समजावून घेता आले. उत्तरे शोधायला मदत झाली.