Name of Book : जुईचं फूल

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 245

Synopsis :
आमच्या जुईचा हा पहिला स्मृतिदिन. नुस्ता बंगलाच नाही तर आजुबाजूचं वातावरणही भारलं गेलं होतं. विद्युतदिपांच्या रोषणाईनं सारा परिसर कसा उजळून निघाला होता. सांगलीत गुर्जरांचं घर नेहमीच उठून दिसणारं. पिढ्यान्‌ पिढ्या चालणारं असं हे भक्कम घर हळुहळू जुन्या नव्याचं मिश्रण होत त्याला बंगल्याचं रुप आलं होतं; पण त्यालाही पंचवीस वर्ष होऊन गेली होती. आता बंगल्याच्या एका बाजूला छोटसं उद्यम मंदिर उभारणं चाललं होतं. मधल्या चौकोनात बाग फुलली होती आणि बागेच्या मध्यावर एक छोटासा चौथरा होता. त्यावर एक मोठा शुभ्र रंगाचा दीप सतत तेवणारा. ही बाबासाहेबांची कल्पना होती. जुईची स्मृती प्रथम इथे दिपाच्या रुपानं इभी राहिली.