Name of Book : लव्हाळे

Name of Author : डॉ शरद कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 121

Synopsis :
खुंटीवरची शबनम बॅग काढून त्यात फाईल व्यवस्थित असल्याची पुन्हा एकदा खात्री करुन घेऊन बॅग खांद्यावर अडकवली. आईनं हातात लाल सुपारी दिली. ती देवापुढे ठेवून दर्शन घेतलं. आई-बाबांच्या पायावर डोकं टेकवलं अन्‌ घाईत स्टॅंडवर आलो तेव्हा चारला पाच मिनिटं कमी होते. बसचा पत्ता नव्हता. बस आधीच निघून गेली होती की काय कोण जाणे! मी घाबरलो.कारण त्या नंतर मला बस नव्हती. चौकशीच्या खिडकीपाशी आलो. तिथे नेहमीप्रमाणे बरीच गर्दी होती. आत बसलेला माणूस रजिस्टरवर काही तरी लिहित होता. मधूनच त्याच्या भोवताली उभ्या असलेल्या कंडक्टरांशी बोलत होता. कुणा साहेबाची थट्टामस्करी चालली होती. तेवढ्यात फोन वाजला. फोनवर कुणाशी तरी बोलून त्याने फोन धाडकन ठेवला. मी हे सगळं अस्वस्थपणे बघत होतो. खिडकीच्या बाजूच्या जाळीला मी माझं नाक लावून माझ्या बसची चौकशी केली.