Name of Book : लोककथा

Name of Author : चंद्रकुमार नलगे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 32

Synopsis :
तामिळनाडूत चैत्रोत्सव मोठे असतात, तर केरळमध्ये ऑगस्ट २५ पासून चालणारा ओणम हा उत्सव महिनाभर असतो. या उत्सवाला "अथचमयम" असेही म्हणतात. सुबत्ता, समता आणि सुसंवाद यांचा एकमेळी असा हा आनंदोत्सव असतो. नवे पीक हाती आल्याचा आनंद व्यक्त करणारा हा सण मल्याळम पंचांगातील पहिल्या "चिंगम" महिन्यात येतो. हा पावसाळ्याचा उत्तरार्ध असतो. हवामान आल्हादकारक व उत्साहवर्धक असते. हिरवा शालू परिधान केलेली धरित्री विविधरंगी फुलांनी नटूनथटून सजलेली असते. याला फुलांचा उत्सव म्हणतात. आपल्याकडे दिवाळी साजरी करतात तसाच हा सण इकडे कर्ज काढून का होईना, साजरा करतात. मल्याळम मध्ये म्हण आहे "कानम विटम ओणम उन्नतम" (सर्वांनी ओणमच्या मेजवानीचा अनुभव घेतलाच पाहिजे.)