Name of Book : कालापुढती चार पाऊले

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 451

Synopsis :
कै. शंतनुराव हे विसाव्या शतकातील एक महापुरुष होते. त्या शतकाच्या उत्तरार्धातील, स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक, आर्थिक सामाजिक विकासामधील त्यांचे योगदान अपूर्व असे होते. त्याची नोंद इतिहासात होण्याच्या दृष्टीने आणि भावी पिढ्यांना त्यापासून स्फूर्ती मिळण्यासाठी त्यांचे समग्र चरित्र जनतेसमोर येणे आवश्यकच होते आणि ती कामगिरी श्री. सविता भावे यांनी या ग्रंथरुपाने समर्थपणे पार पाडली आहे. विशेषतः अनेक मंडळींच्या आठवणींवर हे चरित्र आधारित असल्याने कोणतेही पान उघडा, तेथे शंतनुराव आपणांसमोर जिवंत उभे असल्यासारखे वाटेल. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये अक्षरशः हजारो होतकरु युवकांना साह्य करुन उभे केले. आता त्यांच्या पश्चातही त्यांच्या गोष्टी वाचून तेच कार्य पुढे चालू रहावे इतक्या प्रभावीपणे त्यांचे हे चरित्र लिहिले गेले आहे.