Name of Book : गरुडाचा धुमाकूळ

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
ते ऎकून सात जण त्या दिवाणखान्यासारख्या अशा भव्य खोलीत जमलेले होते. त्यातील एकजण होता कैदी. हातपाय बांधलेल्या अवस्थेत एका खुर्चीत त्याला बसवण्यात आले होते. त्या कैद्याचे वय पन्नास ते साठ या दरम्यान असावे. वयाच्या मानाने तो तसा वयस्कर वाटत असला तरी त्याचे डोळॆ आणि केसांवरुन साठी उलटलेली नसावी हे स्प्ष्ट दिसत होते. त्याच्या अंगावरचे कपडे अगदी सामान्य होते. धोतर, सदरा आणि किंचीत पिवळट रंगाचा कोट. डॊक्यावरची काळी टोपी कुठेतरी उडाली होती.