Name of Book : बेनझीर भुट्टो

Name of Author : विद्याधर सदावर्ते

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
१९४७ मध्ये नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानात लोकशाही स्थापन करण्याचे झालेले सर्व प्रयत्न अल्पजीवीच ठरले. लष्करी हुकूमशाही हाच स्थायीभाव झालेल्या पाकिस्तानात लोकशाही राज्यव्यवस्था आणण्याचा प्रयत्न झुल्फिकार अली भुट्टो यांनी केला होता; पंरतु जनरल झिया उल हक यांनी भुट्टोंचे सरकार उलथवले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि देशद्रोहाचे आरोप ठेवले. १९७९ मध्ये त्यांना फाशी दिली. त्यांच्यानंतर त्यांची कन्या बेनझीर भुट्टो यांनी पीपल्स पार्टीची सुत्रे हाती घेतली. निवडणूक जिंकून त्या १९८८ साली पंतप्रधान झाल्या. त्यांचे सरकारही १९९० मध्ये बरखास्त करण्यात आले. पुन्हा तीन वर्षांनी बेनझीर १९९३ साली दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. १९९६ मध्ये पुन्हा त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले. सर्व बाजूंनी विरोध आणि लष्करी हुकूमशाहीला कंटाळून त्या स्वतःच विजनवासात गेल्या. काही काळ दुबई आणि लंडनमध्येही राहिल्या. आठ वर्षांच्या विजनवासानंतर पुन्हा लोकशाही स्थापन करण्याच्या प्रयत्नासाठी बेनझीर यांनी परवेझ मुशर्रफ यांच्याशी राजकीय समझोता केला. त्या पाकिस्तानात परत आल्या. त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली.. पण २७ डिसेंबर २००७ रोजी त्यांची रावळपिंडी येथे हत्या झाली. पाकिस्तानात पुन्हा लोकशाही आणण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.