Name of Book : सय

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 188

Synopsis :
सोय पाहून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोयीतही सोय पाहिली जाते ते प्रेम! सोहा आणि रोहन ह्यांनी एकमेकांवर असच प्रेम केलं. ज्याला व्यवहारीक जगात "वेडं प्रेम" म्हणून गणलं जाईल. आणि शिरीन नि सोहा ह्या नुसत्या मायलेकी नव्हत्या. एकीचा बहिश्वर प्राण म्हणजे जणू दुसरीचं अस्तित्व! फुलपानागत एकजीव! त्यांच्या नात्याचा हा सुरेख गोफ. सोहाला बाल वयात झालेला मधुमेह... त्या इनसुलीनच्या सुया... काहीच आड आलं नाही प्रेमाच्या महापुरात. त्याचीच ही "सय". संकटांशी ट्टकर देताना एकमेकांवरली प्रीत बावनकशी सोन्यागत झळाळून उठते. त्यालाच जीवन म्हणतात. रसिका, तुझ्यासाठी घेऊन आले आहे ही प्रेमभेट. "सय" वाचून होताच मला पत्र पाठवा प्रिय वाचकांनो. तुमच्या अभिप्रायाची मी आतुरतेने वाट बघत आहे.