Name of Book : रेकॉर्ड ब्रेक-१२५

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 380

Synopsis :
श्रीकृष्णाच्या या श्लोकामुळे माझ्या मनात एक निराळाच विचार आला. आपण एकदा श्रीकृष्णालाच प्रत्यक्ष भेटावं आणि त्याच्याशीच बातचीत करावी, म्हणून मी श्रीकृष्णाला आटोपशीर तपश्चर्या करुन प्रसन्न करुन घेतलं. हल्ली एकेक हजार वर्ष तपश्चर्या करण्याइतकं माणसाचं आयुष्यही नाही आणि पहिल्यासारखी निवांत अरण्यही राहिली नाहीत. श्रीकृष्णालाही सध्याची स्थिती माहीत असावी असं दिसून आलं. कारण माझ्या छोट्याशा तपश्चर्येलाही तो लगेच प्रसन्न झाला. श्रीकृष्णाची भक्तीविषयीची ही तत्परता पाहून मला बरं वाटलं.