Name of Book : आंधळी कोशिंबीर

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 174

Synopsis :
भारतातील अंध आणि अपंगांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक असेल. एक शारिरीक अपंगता सोडली तर हे लोक साधारण माणसासारखे असतात. त्यांच्या सामाजिक, शारिरीक आणि मानसिक गरजा इतरांसारख्याच असतात. अंध व अपंगांच्या समस्यांविषयी आपल्याकडे जागरुकता नाही. समाज त्यांच्या प्रश्नांविषयी फारसा विचार करत नाही. परिणामतः अंध आणि अपंग न्यूनगंड व विकृतीच्या कोशात गुरफटले जातात. त्यांचे स्वतःचे असे वेगळे जग तयार होते. आंधळी कोशिंबीर ही कादंबरी अशा उपेक्षित लोकांच्या आयुष्यात डोकावण्याचा केलेला प्रयत्न आहे. मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म निरीक्षण, ओघवती निवेदनशैली, आशयघन कथेमुळे ही कादंबरी वाचनीय तसेच उद्‍बोधक झाली आहे.