Name of Book : पंचतंत्राच्या गोष्टी

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 78

Synopsis :
पंचतंत्राच्या गोष्टी विश्वसाहित्यातील अमोल ठेवा आहे. बालकुमार वाचकांपासून प्रौढ वाचकांपर्यंत सर्वांना त्या आवडतात. पंचतंत्राच्या गोष्टी वर्षानुवर्षे मौखिक परंपरेत सांगितल्या जातात. लिखित स्वरुपात प्रथम त्या संस्कृतमध्ये लिहिल्या गेल्या. तेथून अनेक भाषांत गेल्या आणि शतकानुशतके या गोष्टी सांगितल्या जात आहेत. एक राजा असतो. त्याला तीन मुले होती. ते सर्व मुर्ख होते. राजाला मुलांची काळजी वाटायची. राजकुमारांना शिक्षणात गोडी नव्ह्ती. अश्या राजकुमारांना शिकविण्याचं काम विष्णू शर्मा नावाच्या पंडितावर सोपविलं. विष्णू शर्मा दररोज राजपुत्रांना एकेक गोष्ट सांगू लागला. गोष्टींची पात्रं मुख्यतः पक्षी आणि प्राणीच होते. राजकुमार या गोष्टीत रंगू लागले. सहा महिन्यांत त्यांना गोष्टीतून सदगुणांचा आणि सुखी जीवनाचा परिचय झाला. कष्ट, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, सहकार, श्रमनिष्टा, संस्कार, दुसऱ्यास मदत करणे, मित्रप्रेम, मनाचा निश्चय आणि ज्ञानाची साथ मिळाली की माणूस आनंदी जीवन जगू शकतो, हे सारं जीवनाचं सार पंचतंत्राच्या गोष्टीत आढळतं.