Name of Book : नाते प्लॅस्टिकशी

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 140

Synopsis :
गेल्या चाळीस पन्नास वर्षात अनेक प्लॅस्टिक पदार्थ विकसित झाले., तसे ते लोकप्रियही झाले. ’प्लॅस्टिकच्या वस्तू तकलादू असतात’, हा भ्रम आता संपलेला आहे. असे हे कृत्रिम पदार्थ विपुल प्रमाणात निर्माण केले गेले. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मावर आधारित आज अनेक प्लॅस्टिक वस्तू लोकप्रिय झाल्या आहेत. आताच पाहा ना, टूथब्रश शिवाय दात घासणे ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. कंगवा, प्लॅस्टिकच्या बादल्या, बटणं, फोन, लॅम्पशेडस् यांचा आपल्या जीवनात समावेश झाला आहे. त्यामुळे आपले राहणीमान नकळत बदललं आहे. जड, फुटणाऱ्या काचेच्या बाटलीऎवजी पॉलिइथिलीनची हलकी-फुलकी दुधाची पिशवी आली. अशा अनेक प्लॅस्टिक पदार्थांनी आपला ताबा घेतला आहे. अशा बहुगुणी पदार्थाची ओळख् आपण सर्वांनाच आज असायला हवी आहे. पॉलिइथिलीन, टेफलॉन, पॉलिस्टायरीन-थर्मोकोल, पॉलियुरेथेन या पदार्थांची ओळख मी ’किमया प्लॅस्टिकची’ या पुस्तकाद्वारे लोकांना करून दिली आहे. अनेक वाचकांनी या पुस्तकाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे; पंरतु पुस्तक अपुरं वाटत होतं. उरलेल्या प्लॅस्टिक पदार्थांची ओळख करून देणं जरुरीचे आहे याची मला जाणीव् झाली. त्यादृष्टीने हे अपुरं काम पूर्ण करण्याचे मी प्रयत्न केले. या प्रयत्नांचे फळ म्हणजे माझे हे पुस्तक ’नाते प्लॅस्टिकशी’. हे पुस्तक वाचक स्वीकारतील, अशी आशा आहे.