Name of Book : जरीला

Name of Author : भालचंद्र नेमाडे

Reading Cost : $1.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 294

Synopsis :
’जरिला’ कादंबरीतील अनुभवविश्व व त्याचा आविष्कार करणारे प्रसंग मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे प्रसंग रूढ अर्थाने अतिशय सामान्य, साधे, नित्य जीवनातले, कलाकृतीच्या संदर्भात कलामूल्य कमी जाणवणारे असे आहेत. सरपटणाऱ्या जीवनाचा संथ आणि मंद आवेग शब्दांकित करण्याची भूमिका असलेल्या लेखकाने अतिशय सामान्य प्रसंग चित्रित केलेले आहेत. पण वैशिष्ट्य असे की, त्यांच्या पोटातील जीवनदर्शनाची अमाप शक्ती प्रकट करून त्यांना अर्थपूर्ण बनविले आहे. कोणताही वा त्यातून येणारा अनुभव अतिसामान्य नसतो. त्यालाही जीवनाच्या आविष्कारात अर्थ व संदर्भ असू शकतो. असा त्या त्या प्रसंगातील अर्थ उलगडून त्या प्रसंगाची श्रीमंती प्रगट केलेली आहे. अशा प्रसंगांतून जीवनाची जी जाण, समज प्रतीत होते तीच जीवनाला अधिक स्पष्ट करणारी आहे.