Name of Book : छोटी सी बात

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 154

Synopsis :
आणि आपण चक्क पालक बनतो. कधी एकदा, दोनदा (सध्या अपवादात्मक) तीनदा. एकंदर राहणीमान आर्थिक स्थितीचे भविष्यातील अंदाज आणि वर्तमानातला बाज; या अशा मुद्यांचे मूल्यमापन करुन आपण (म्हणजे होऊ घातलेले आई-बाबा) एका जीवाला जन्म देण्याचा निर्णय घेतो. पण या जीवाचे "पालक" बनावे म्हणून हे आई-बाबा काय वाचन-मनन-चिंतन करतात? कुणाचा सल्ला घेतात? बदलत्या जगामधल्या बदलत्या नात्याला, निरोगी पद्धतीने घडण्यासाठी, कशी मदत करावी यावर किती चर्चा होते?... चर्चा सोडा, गप्पा होतात?... याच्या अगदी दुसऱ्या टोकालाही काही मंडळी असतात. "संगोपनशास्त्राचा" त्यांचा व्यासंग इतका महान असतो, की पालकत्वाचा अभ्यास करता करता त्यावेळी मजा, मस्ती, गंमत हे सारेच ते "ऑप्शनला"टाकतात. या दोन टोकांच्यामध्ये ज्यांना पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो आणि त्यात शास्त्र आणि कला यांचा मिलाफ असतो अशी प्राचीन ग्रीक म्हण ठाऊक असते,असा गट असतो. अशा गटाला काय करायचे, कुठे जायचे हे ठाऊक असते पण कसे जायचे याबद्दल ते संभ्रमात असतात. अशा तिन्ही गटांसाठी ही"छोटीसी बात" घेऊन राजीव तांबे आले आहेत. पालकांनी पहिल्यांदा ते संपूर्ण वाचावं. त्यनंतर रोज एक "छोटीसी बात" वाचावी.