Name of Book : मर्ढेकर मुंबई आणि मी

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 106

Synopsis :
या लेखाचं शिर्षक "मर्ढेकर, मुंबई आणि मी" असं द्यावं की "मी, मुंबई आणि मर्ढेकर" असं द्यावं हे काही केल्या मला ठरवता येत नव्हतं. लहानपणी ऎकलेल्या शेतकरी, वाघ, शेळी आणि गवताचा भारा यांच्या तेरमाईच्या गोष्टीतल्या सारखा गहन प्रश्न माझ्यापुढे उभा होता. ती गोष्ट इथे सांगत बसत नाही. कारण ती सर्वांना परिचित अशीच आहे.अर्थात शेतकऱ्याचा प्रश्न माझ्यापेक्षाही गहन होता कारण त्याला सर्वांना शाबूत ठेवून नदी पार करायची होती. मला काय कसेही शीर्षक दिले तरी संपादक किंवा वाचक मला खाणार नव्हते. मला नक्की काय म्हणायचंय ते त्यांनी समजून घेतले असते आणि ही खात्री असल्यामुळेच शेवटी मी मला जसे योग्य वाटले तसे शीर्षक बिनधास्त माझ्या लेखाला देऊन मोकळी झाले.