Name of Book : मुक्त

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
"आईल" मध्ये ढकलगाडी आली. ड्युटी फ्री सामान घेण्याची ही अखेरची संधी, एअर होस्टेसची उडालेली धांदल. कामं आवरुन त्या आपापल्या नियोजित जागांकडे उभ्या. प्रवाशांत पसरलेली एक्साइटमेंट. जे तीन-चार वर्षांनी प्रथमच मायदेशाकडे परतत होते त्यांना असह्य होत असलेलं एकेक मिनिट. जे अनेकदा येऊन गेले होते त्या अनुभवी प्रवाशांचा थंडपणा. परदेशी हौशी टूरिस्टनी खिडक्यांच्या काचांना लावलेलं नाक. पूर्वेला तांबडं फुटत होतं. एअर इंडियाची विमानं बहुदा मध्यरात्रीनंतर लॅंन्ड होत असली तरी ही उशीर झाल्यामुळे आज पहाटे लॅंन्ड होणार होती. अजून निळा अरबी समुद्र तेवढासा स्पष्ट दिसत नव्हता. ट्रॉलर्स, शीडवाल्या मासेमारी होड्या, किनाऱ्याकडे सरकणाऱ्या बोटी, मासेमारी होड्यांच्या जवळपास घोटाळणारे समुद्रपक्षी अजून दिसत नव्हते.