Name of Book : मन रंगांचे आभास

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 78

Synopsis :
शब्दवैभव साहित्य प्रेमींची सतरा वर्षांची वाटचाल गुणी साहित्य प्रेमींचा शोध हा प्रधान हेतू मनात ठेऊन झालेला हा प्रवास. सातत्य, साहित्य आणि सौहार्द ही त्रिसूत्री. कवितेचं प्रेम हे पहिलं प्रेम, या प्रेमापोटीच ’शब्द वेचिता बहरू’ या पहिल्या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे संयोजन केले. साहित्यिक लौकीक पाठीशी नसतानाही कवित्व जोपासणारी नवी जुनी कविमंडळी पुढे सरसावली. नाजूक साजुक शब्दांनी भरले आमचे घर... हा शब्दशोध अजून चालू आहे. शब्दमोर नाचताहेत, मन भरुन आले आहे. शब्दत्सोव सुरु होतो आहे, आभास होताहेत, व्यक्त झाल्याशिवाय आता पर्याय नाही. मनरंगांची ही वैविध्यपूर्ण उधळण शब्दबध्द रुपात रसिकांपुढे आणताना माझे समाधान ऊतू जात आहे. ’जोवर येथे कविता आहेत ... तोवर माझे प्राण आहेत...’ असे एका कवीने म्हटले आहे. काव्य रसिकांना दिलासा वाटावा अशी ही अभिव्यक्ती...