Name of Book : अजन्मा

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 186

Synopsis :
कॉलेजरोडवर तशी वर्दळ कमी होती. हातातली पुस्तकं सावरीत सोनीया कट्ट्यावर बसली. तिचा ऊर अजून धपापत होता. डोळे तांबारले होते. "हे तू बरं नाही केलंस." नयन तीच्यासमोर उभी होती." लीलावतीदेवींना हे कळलं तर त्या तुझ्या खिमा करतील." पण ते पत्र माझं नव्हतं गं. " सोनिया उसळली. "ठाऊक आहे गं मला ते चांगलं. पण बाईंची वेणी तू ओढलीस..." बाईंनी माझ्या वेण्या ओढल्या नाहीत? झिंज्या उपटून हातात देईन म्हणाल्या नाहीत? शब्दागणिक सोनियाचा आवाज वाढत होता.