Name of Book : सोळा भाषणे

Name of Author : भालचंद्र नेमाडे

Reading Cost : $1.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 239

Synopsis :
मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि कस वाढवण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी आपला जीवनानुभव साहित्यात आणणं गरजेचे आहे, ह्या धारणेने प्रस्थापितांविरुध्द उठाव केलेल्या साठोत्तरी चळवळीची गद्य बाजू भालचंद्र नेमाडे ह्यांनी समर्थपणे सांभाळली. लिहिण्याची परंपरा नसलेल्या वर्गातील लोकांना लिहिण्याची प्रेरणा देण्यासाठी केवळ तात्विक वा सैध्दांतिक मांडणी करून भागणार नाही, तर प्रत्यक्ष संवाद आणि संपर्काचीही नितांत गरज आहे, याचे त्यांना पुरेपूरभान होते. त्यामुळेच त्यांनी पाच सज्जड कादंबऱ्या लिहून, त्या जोडीनेच चर्चासत्रे, विविध माध्यमे ह्यांतून मूलाखती, भाषणे देणे हे कामही-वेळप्रसंगी स्वतःच्या सृजनाला मुरड घालून-अत्यंत निष्ठेने आणि अव्याहतपणे सुरूच ठेवले. ह्या संवादांतून नेमाडेंनी मांडलेले विचार समाजशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहेत. ह्या नव्वदोत्तरी सोळा भाषणांमधून, नेमाडेंचा व्यासंग, कळकळ, विचारांची चौफेर झेप, सडेतोड वृत्ती, भाषेवरची हुकमत ही वैशिष्टये तर नेहमीप्रमाणे जाणवतातच, शिवाय साठोत्तरी चळवळीच्या वाटचालीत मराठी साहित्याचे जे काही भलेबुरे झाले त्याची झाडाझडतीही नेमाडे इथे घेताना दिसतात.