Name of Book : वास्तव

Name of Author : योगिनी वेंगुर्लेकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 311

Synopsis :
पुण्याचा भूगोल वेगानं बदलत होता. सायकल वरुन दूरच्या ठिकाणी जाणं अवघड होत चाललं. ही वय वाढल्याची खूण होती. त्याशिवाय इतरही काही घडत होतंच, सोबतीला ते म्हणजे प्रत्यक्ष अनुभवावी लागणारी बेकरी, विचित्र तडजोडी करायला लावणारी वणव्यासारखी पेटलेली महागाई हे वास्तव! जगण्याचा अर्थ आणि माणूसपणाचं मोल समजून आलं ते या वास्तवाच्या दर्शनानं. एव्हाना अर्थशास्त्र शिकविण्याची नोकरी मिळाली होती. थोडी स्वस्थता मिळताच मनातल्या "वास्तवाचं" दर्शन कथेच्या रुपाने कागदावर उतरायला लागलं. हे "वास्तव" अधिक प्रत्ययकारी शब्दात पकडायला प्रयत्न करत राहणं हीच माझी ओळख!