Name of Book : अक्षरप्रीत

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 146

Synopsis :
१९३९ साली माझी आई गेली मी सहा वर्षाचा होतो. पेणला हनुमान आळीमध्ये जोशी वकिलांच्या वाड्यात आमचे बिऱ्हाड होते. घर सांभाळायला राहिलेल्या आठवले दांपत्याचे लक्ष मुख्यतः माझ्या धाकट्या भावाकडे असे. कारण एकतर तो दोन वर्षांचा आणि रिकेटी होता. त्यामुळे मी वाऱ्यावर हिंडायला मोकळा होतो. समोरच रस्त्यापलीकडे माझा तेव्हापासूनचा मित्र बाळ दामले राहायचा. त्याच्याकडे कर्ती त्याची आजी काकाई होती. तिच्या संग्रही रामायण, महाभारत, आणि इतर अनेक पौराणिक ग्रंथ असत. ते वाचायचा मला छंद जडला.