Name of Book : पॅरिसमधील संकट

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 261

Synopsis :
पर्ल हा क्लब रात्री साधारण आठ वाजता सुरु होई. बाहेरुन त्याचा झगमगाट अजिबात जाणवत नसे. सुमारे दिड दोनशे माणसांनी फुललेला हा क्लब बाहेरुन कसा शांत शांत वाटे. तो दिवस सुट्टीचा. त्या दिवशी क्लब नेहमीपेक्षा अधिक फुलून गेला होता. आतून येणारे हास्यकल्लोळांचे आवाज आणि त्यातूनच उमटणारे संगीताचे सूर बाहेरच्या रस्त्यावर मुळीच ऎकू येत नव्हते. त्या रस्त्यावर रहदारीदेखील तशी फारशी नव्हती.