Name of Book : अदृश्य सृष्टी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
सर्वत्र गडद अंधार पसरला होता. मोटरसायकलचाही दिवा बंद झाल्यामुळे अंधार अधिकच भयाण भासत होता. त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. पुन्हा तेच शब्द ऎकण्यासाठी. तसलाच आवाज ऎकण्यासाठी विजयचे कान आतुर झाले होते. पण अर्धा तास लोटला तरी पुन्हा काही आवाज त्याच्या कानात शिरला नव्हता. मोटारसायकलीला किक मारण्यासाठी त्याने पाय उचलला आणि त्याचवेळी तो स्तब्द झाला. सावकाश त्याचा पाय जमिनीला टेकला. त्याने कान टवकारले. निर्जन आणि पहाडी भागात कुणी असणेच शक्य नव्हते.