Name of Book : दुरदर्शी शिक्षणयोगी

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $1.0/ Rs.25 / Free

No. Of Pages : 430

Synopsis :
जे. पी .नाईक यांच्या चरित्राला प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे हा मी माझा गौरव मानतो. त्याच बरोबर हे काम म्हणजे एक जबरदस्त आव्हान आहे, हेही मी जाणतो. जे. पी. नाईक हे एक प्रतिभावान विचारवंत आणि विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारकाच्या धडाडीने परिवर्तन घडवून आणणारे सेनानी होते. असामान्य बुद्धीमत्ता, अफाट व्यासंग, अव्दितीय स्मरणशक्ती यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये झालेला होता. जनसामान्यांच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. आणि ते कर्तृत्व जागृत करण्याची किमया ते सहजतेने करीत असत. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भारताचे जे स्वप्न ह्या तरुण वयात नाईक यांनी मनाशी रेखाटले होते ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी नंतरच्या आयुष्यात अनेक क्षेत्रात अभिनव प्रयोग यशस्वी करुन दाखवले.