Name of Book : विसावा

Name of Author : उषा लिमये

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 95

Synopsis :
माझा विसावा हा पहिलापहिला काव्यसंग्रह रसिकांना सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे. पण त्याच बरोबर माझ्या या वेड्यावाकड्या कलाकृतीचं रसिकांकडून कस स्वागत होईल याबद्द्ल धाकधूकहि वाटत आहे. कारण जीवनांतील कडूगोड अनुभूती, मनावर ठसलेले किंवा जवळून पाहिलेले उत्कट प्रसंग यांतूनच माझी कविता निर्माण झाली. घराच्या उंबरठ्याबाहेर तिचं पाऊल फारसं पडलेलं नाही. माझ्या काव्यात कल्पनेची उंच भरारी नाही, भाषेचं सौष्ठव नाही पांडित्याचं तेज नाही किंवा प्रथितयश कवींप्रमाणे रसिकांना काहीतरी संदेश देण्याचा अभिनिवेशहि नाही.