Name of Book : जॅकपॉट

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 193

Synopsis :
ऍनी अगोदरच उठली होती. किचनमध्ये होती. लोबोना वाटलं, आजचा दिवस उत्तम आहे. काल सकाळी सुट्टीचे आठ दिवस गोव्याला-आसेगावला काढून ते पणजी-मुंबई रातराणीने मुंबईत आले. तेंव्हा जरा धास्तावलेलेच होते. या आठ दिवसात ऍनीला कितपत त्रास झाला असेल याची त्यांना काळजी लागली होती. गोव्यात जायला तर हवंच होतं. घराकडे, बागेकडे आता लक्ष द्यायला हवं होतं. निवृत्तीला आता जेमतेम दोन वर्ष उरली होती. चोवीसशे पगार, त्यानंतर पेन्शन म्हणजे, अर्ध उत्पन्न. ज्यो जेमतेम बी. ए. झाली. ट्रॅव्हल एजन्सीतं कशीबशी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता फारशी नव्हती. जेकब तेवढाही शिकला नाही.एका केबलवाल्याकडे चिकटला, लाईनमन म्हणून पण पगाराशिवाय त्याला थोडी वरकमाई होई. सर्व कनेक्शन दिलं, काही बिघाड असला, तर ताबडतोब लाइन फॉल्ट काढून चॅनेल्स सुरु करुन दिली की ग्राहक स्वखुषीने दहा-वीस रुपये देत असत. त्यातून त्याचा स्वतःचा वरखर्च सुटे, शिवाय अधूनमधून तो कधी फिश चांगलं मिळालं, प्रॉन्स मिळाले तर आणायचा, हे सगळं जादा कमाईतून,त्यामुळे तेवढी ओढ जाणवत नव्हती. महिना पार पडत होता.