Name of Book : देखणी

Name of Author : भालचंद्र नेमाडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 70

Synopsis :
या कवितेत ’आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा’ निरर्थक न ठरो, झाडातून डोकावणारे ’रोशन सूर्य’ न ढळोत, विनाशतत्वाच्या झपाट्यात’ जमिनीतली ’उग्रगंधी धूळ’ दरवळो आणि, जगण्याची समृध्द अडगळ’ घरभर साचून राहो असे पसायदान मागितले आहे. या सर्व सचेतन प्रतिमांमधुन जीवनदायी प्रेरणांचा स्त्रोत ओसंडून वाहताना दिसतो. महानगरी कवितेतील मरणाधीन वृतीला शह देणारी ही वृती आहे. पण मरणाच्या डोळस जाणिवेमुळे या कवितेतील जीवननिष्ठा फोल न ठरता तिला बळकटीच येते. चांगल्या जगण्याला नेहमीच असा मरणाचा अंकुश असतो. म्हणून मरणाच्या जाणिवेतून सूचित होणारे विनाशतत्त्व दृष्टिआड करून नेमाड्यांची कविता भाबड्या आशावादाकडे झुकत नाही. तसेच महानगरी कवितेप्रमाणे मरणाच्या सार्वभौमत्त्वाला आव्हान देणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचे भक्कम संदर्भ ती उभे करते. या विनाशतत्त्वाला शह देणारी जगण्याची उभारी आणि त्यातून अटळपणे येणारी लढाऊ वृत्ती हा स्थायीभाव असलेल्या नेमाड्यांच्या उमद्या जीवनदृष्टीचे दर्शन त्यांच्या कवितेतही होते.