Name of Book : सखी सावित्रि

Name of Author : मंदा कदम

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 268

Synopsis :
सावित्रीबाई आणि जोतीराव या दोन महात्म्यांचे भावजीवन एखाद्या कादंबरीच्या लयीने, छायाप्रकाशातील सुरेल वाद्यमेळाप्रमाणे, वैचारिकतेबरोबरच भावानुभूतीचा प्रत्यय देत साक्षात नाट्यरुप घेते ते "सखी सावित्री" या खंडकाव्याच्या रुपात. सत्याला साक्षी ठेऊनच फुले दांपत्याच्या सहजीवनाचा विशाल वटवृक्ष सखीसावित्रीत सौंदर्यपूर्ण रीतीने साकार होतो. सौंदर्य, बुद्धीमत्ता, धैर्य, दया, क्षमा, अन्यायाची चीड, दुःखीतांविषयीची कणव, क्रियाशीलता, संवेदनशिलता , सामाजिक दुखणाईतासाठी, त्यांच्या उत्थापनासाठी, कार्य करण्याची उर्मी आणि उमेद, स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती, निर्णय क्षमता, यासारख्या गुणांनी मंडीत असतानाही अहंकाररहित साधेपणा, हे सावित्रीबाईंचे वैशिष्ट्य या खंडकाव्यात प्रत्ययाला येते.