Name of Book : उत्तररात्रीचं चांदणं

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 102

Synopsis :
स्वच्छ चंद्रप्रकाशाच्या शांत रात्री मला फार आवडतात. त्यातून पहिल्या प्रहरातील चांदरातीपेक्षा उत्तररात्रीच्या चंद्रप्रकाशाची मजा आणि होणारा आनंद काही औरच असतो. निद्रादेवीच्या कुशीत अवघे विश्व गाढ झोपलेले असते. अशा वेळी जाग्या असतात त्या आकाशातील चांदण्या आणि त्यांचा प्रिय सखा चंद्र. निरभ्र आकाश, शीतल चंद्रप्रकाश आणि त्या धुंदल्या रात्री फक्त चंद्र आणि तारकांची निःशब्द क्रीडा! उत्तररात्री हा खेळ शिगेला पोहोचलेला असतो. अशा वेळी तारकांच्या फेऱ्यात विहरणारा हा चंद्र पाहताना मला स्वर्गीय आनंद होतो. त्या उत्तररात्रीच्या विलक्षण पण धुंद आणि आत्मकेंद्रीत करणाऱ्या चंद्रप्रकाशातील वृक्षांच्या सावल्या रातकिड्यांच्या एकसुरी संगीतात न्याहाळत बसण्याचा मला छंद आहे, अशा वेळी अबोल, शांत आणि तृप्त दिसणाऱ्या वृक्षांशी मी कित्येकदा मुक्त हितगुज केलेले आहे.