Name of Book : मदहोश

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 254

Synopsis :
जोगेश्वरीला जाताना मनकर्णिका स्वतःच्या थाटावर खूष असली तरी काहीशी बेचैन होती. लग्न होऊन तीनच दिवस झालेले. देवीच्या दर्शनाला नवरानवरीने मिळून जायचे असते हे तिने आईकडे असताना ऎकल होतं. पण ती सासूबरोबर चालली होती. असं का? प्रश्न मनात आल्यावर तिने रिक्षात शेजारी बसलेल्या माईंकडे पाहिले, त्यांची नजर समोरच्या रस्त्यावर खिळलेली होती. तिच्याकडे त्यांच लक्ष नव्हते. कपाळावर कुंकू नाही ही वैधव्याची खूण सोडली तर माईंच्या दर्शनात कोठेही भकास किंवा अशुभ असे काही नव्हते. शरीरबांधा नेटका, वयाची पन्नाशी उलटली असूनही केस काळॆ. अंगावरचे पातळ सुतीच पण भारी किंमतीच, हालाचालीत खानदानी डौल. आणि या साऱ्यांना व्यापून रहिलेला शांतपणा.