Name of Book : माझी चिंध्याची बाहुली

Name of Author : अनुराधा वैद्य

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
जो आशय सांगावयाचा, तो आशय एखाद्या प्रचलित, प्रस्थापित आकृतीबंधातून सांगता येत नसेल तर चाकोरी मोडावयास काहीच हरकत नाही. मराठी वाङमयात अशी तोडमोड करुन अनेक नवे प्रकार यापूर्वीही आलेले आहेत. जेव्हा "कही तरी" सांगावयाचे असते, तेव्हा "कहीतरीचा" नेमका तोच अर्थ लक्षात आणून देण्यासाठी, जे लिहिले जाते, ते प्रचलीत, प्रस्थापित आकृतीबंधाचा विचार न करता फक्त आशयाचा विचार करुनच लिहिले जाते. सौ.अनुराधा श. वैद्य यांची ही ’माझी चिंध्याची बाहुली’ ही रचना त्याच प्रकारात मोडणारी आहे. त्यांनी जे अनुभवले त्याच्या घुसमटीतून, त्यांच्या संवेदनाशील मनांतून जे बाहेर पडले तेच त्यानी स्वैर मुक्त छंद गद्यकाव्य किंवा काव्यात्म ललित म्हणा अथवा "काव्यांबरी" म्हणा, साहित्य रसिकसमोर ठेवले आहे. त्यांच्या लेखनातील अनुभवलेली वास्तवता बोचरी आहे, अस्वस्थ करणारी आहे, तशीच ती दाहकही आहे, आणि त्यांतल्या अस्सलपणाच्या रेखाटनासाठी लेखिकेला अपरिहार्यपणे चाकोरी मोडावी लागली आहे. परंतु त्याचं फारसं भांडवल न करता मराठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक वाचकांना, सौ. अनुराधा श. वैद्य यांची ही अस्वस्थ व अंतर्मुख करावयास लावणारी, निश्चित वाङमयीन आयामात न बसणारी साहित्यकृती निश्चितच भावून जाईल असा विश्वास वाटतो.