Name of Book : प्रधानमास्तर

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 320

Synopsis :
अभिजात शिक्षकाचे नुसते अस्तित्वच त्याच्या शिष्यांना आणि भोवतालच्या सर्वांना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरत असते. प्रधानमास्तर तर साने गुरुजींच्या "धडपडणाऱ्या मुलां" पैकी एक. तेव्हा ते सतत इतरांसाठी, समाजासाठी आपल्याला काय करता येईल ती धडपड करीत राहिले, मग त्यांची भूमिका कोणतीही असो. चळवळीतील सत्याग्रही, कॉलेजमधील प्राध्यापक, विधान परिषदेत आमदार आणि विरोधी पक्षनेते, "साधनाचे" संपादक, चतुरस्त्र साहित्यिक, प्रभावी वक्ते, दिलदार मित्र अशा अनेक रुपात वावरुनही प्रा. ग. प्र. प्रधान हे "प्रधानमास्तर" च राहिले. त्यांच्या या प्रदिर्घ, संघर्षमय आणि निःस्वार्थ वाटचालीची आणि प्रगल्भ विचारांची ही एक प्रत्ययकारी कहाणी. विद्यार्थ्यांच्या आणि तरुण पिढीच्या हाती असायलाच हवा असा प्रकाशदीप, भोवतालचे तम उजळून टाकणारा........