Name of Book : किमया प्लॅस्टिकची

Name of Author : डॉ. मधुकर साबणे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 148

Synopsis :
प्लॅस्टिक-पॉलिमर हे अधातू पदार्थ अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. वजनाने हलके, उष्णतेने पातळ किंवा घट्ट होणारे, रबराची लवचिकता, सहजपणे साच्याचे आकार घेणारे, पारदर्शक किंवा अपारदर्शक, पाणी शोषुन घेणारे किंवा दूर लोटणारे व कमी खर्चात तयार करता येणारे, असे अनेक गुणधर्म या पदार्थात एकवटलेले असतात. गेल्या चाळीस वर्षात अनेक खास गुणधर्म असलेले प्लॅस्टिक पदार्थ प्रयोगशाळेत निर्माण केले गेले. अगदी अल्प काळात या पदार्थांनी घर ते म्हणून तर सध्या अंतराळ काबीज केले. यापूर्वी मी शास्त्रीय विषयावर लेखन केले, पण त्या वेळी शास्त्रीय महिती देण्याची भाषा मला बोजड, क्लिष्ट वाटली. गणितासारखे विषय हसत-खेळत शिकवतात किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात, तर मग प्लॅस्टिक/ पॉलिमर रसायनशास्त्रासारखा विषय सुबोध, बाळबोध शब्दांत का मांडता येऊ नये, असा विचार माझ्या मनात आला.