Name of Book : नावडती मुले

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 224

Synopsis :
डॉ. हेलन केलर यांचे महत्व केवळ त्यांच्या वैयक्तिक गुणांमुळेच नव्हे तर त्यांच्या युगप्रवर्तक कार्यामुळे वाढलेले आहे. डॉ. हेलन केलर ह्या स्वतः आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या होत्या. असे मी मुद्दाम म्हणतो. कारण स्वतःच्या दृढ निश्चयाने व भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी या पंगुपणावर विजय मिळविलेला आहे आणि जगांतील साऱ्या आंधळ्या मुक्या आणि बहिऱ्या माणसांपुढे व समाजसेवेच्या ह्या क्षेत्रांतील कार्यकर्त्यांपुढे एक थोर आदर्श घालून दिलेला आहे. डॉ. हेलन केलर यांचे जीवन म्हणजे एक सुरस अद्‍भूत कथा आहे असे वाटते. त्यांचे तेजस्वी चरित्र आणि भारतातील आंधळी मुलें, ह्यांचे चित्र एकत्रित पाहतांच एक सुखस्वप्न माझ्या डोळ्यांपुढे तरळू लागते. आमच्या ह्या अभागी मुलांतून एखादी हेलन केलर नाही का निर्माण होणार? केवळ तीच आपल्या तपश्चर्येनें ह्या कार्याला उठाव देऊन, आजवर अंधारांत चांचपडणाऱ्या त्या अभागी मुलांचे दुर्दैवी जीवन उजळून टाकूं शकेल.