Name of Book : एकादश कथा

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 148

Synopsis :
पन्नीसाठीच ती खरोखर जगत होती. नवऱ्याच्या हजारो खुणा-वस्तू ट्रंकेत टाकून तिला कुलूप ठोकून टाकावं तशा नजरेआड केल्या होत्या. बंद करुन टाकल्या होत्या. सुरुवातीला घरातल्या लोकांनी बरोबर राहून मदत केली होती. पण ते तसे परकेच! चुलत किंवा मावस. कारण तिच्या घरी वडील वारल्यानंतर आई भावाबरोबर अमेरिकेत गेलेली होती. ती महिनाभर उमाबरोबर राहून गेली. तिच्या सांधेदुखीमुळे तिला सारखे बोलावणे शक्य नव्हते. पन्नीच्या वडीलाकडून तिचा नवरा एकटा मुलगा होता. सासरा स्वतःला एकुलता एकच होता. एकूण कारभार सांभाळायला माणूसबळ नसल्यातच जमा होते.