Name of Book : काचकमळ

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
काचेच्या लांबट पट्ट्याच्या त्रिकोण करुन त्यात फुटलेल्या बांगड्यांचे रंगीत तुकडे घातले आणि एक बाजू बंद करुन दुसऱ्या बाजूने पाहिले की सुरेख कमळ बनलेले दिसते. थोडासा कोन बदलला वा पट्ट्यांचा त्रिकोण हलवला की या कमळाच्या पाकळीचा आकार, रंगसंगती बदलते अन् नवे कमळ साकारते. झपाट्याने बदलणाऱ्या आसपासच्या जगामधे घडणाऱ्या घटनांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला की असेच नवे आकृतीबंध अंतचक्षूना दिसतात. त्यांना शब्दात पकडून वाचकांपर्यंंत त्या रंगकळा पोचवायचा प्रयत्न म्हणजे या कथा. आपल्या आसपासच्या स्त्रीपुरुषांची प्रतिबिंबे या कथामध्ये वाचकांना प्रतीत व्हावीत आणि एक अनोखे वाचक-लेखक नाते साकारावे, त्यामुळे या काचकमळाला आणखी एक मिती लाभावी एवढेच मागणे.