Name of Book : वारस

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 242

Synopsis :
दुपारची विश्रांती संपवून बेडरुममधुन स्वयंपाकघराकडे निघालेले शंतनुराव मधल्या खोलीतील बायकांच्या घोळक्यातील हशाच्या आवाजाने थबकले आणि त्या खोलीकडे वळले. त्या पाच बायकांमध्ये अनोळखी अशी कोणी नव्हती. लालजर्द जरीकाठाचे पिवळेधमक सिल्क नेसलेली, पाठमोरी असूनही शरीर सौंदर्याची कल्पना देणारी त्यांची पत्नी कमला होती. तिच्या शेजारी पाटावर मांडी घालून बसलेली, फॅन्सी सिफॉनच्या चमकदार पातळाने आपली फॅशनेबल राहणी दाखवणारी त्यांची धाकटी बहीण शकुंतला, तिच्या शेजारी त्यांची मावशी आणि समोरच्या दोघी पूर्वी ते ज्या माळवदे चाळीत रहात होते, तेथे शेजारी राहाणाऱ्या होत्या. अर्धगोलात बसलेल्या त्या पाच जणींच्या पुढ्यात बऱ्याच भांड्यांचा पसारा दिसत होता. त्या आपल्या कामात गर्क असल्याने पाठीमागे दारात उभे राहिलेल्या शंतनूरावांकडे त्यांच्यापैकी कोणाचे लक्ष गेले, नाही. त्या सगळ्या तरतऱ्हेचे लाडू वळत होत्या.