Name of Book : भारतेरिका

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 130

Synopsis :
आपल्या देशात बऱ्याच महत्वाच्या गोष्टी तीन या आकड्यात आहेत. आपल्या देशाला तीन नावं आहेत. भारत इंडीया आणि हिंदुस्तान. यापैकी इंडीयातले लोक सुखानं राहतात. भारतातले लोक नुस्तेच राहतात. आणि हिंदुस्तानातले लोक कसेबसे राहतात. यावरुन देशातील तीन सामाजिक स्तरांचं यथातथ्य दर्शन होतं. सगळ्याच स्तरातले लोक एकाच नावात कोंबले असते तर "सुखानं, नुसते, आणि कसेबसे याचं एकत्र गाठोडं बांधावं लागलं असतं. ते इंडीयातल्या लोकांना आवडलं नसतं, भारतातल्या लोकांना हिंदुस्तानातले लोक आवडले नसते. म्हणून देशाला तीन नावं ठेवली गेली हे योग्यच झालं. नंतर कुणीतरी नावं ठेवण्यापेक्षा हे बेस्ट केलं. तीन नावांमुळे आपल्या देशाची कीर्तीही त्रिखंडात सतत गाजत असते.