Name of Book : वेडापीर

Name of Author : सौ सुमन भडभडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 126

Synopsis :
सोलापूरला आम्ही नुकतेच आलो होतो. घरही मनासारखे मिळाले होते. एके दिवशी सकाळीच दारावरची बेल खणखणली. अनोळखी गावात इतक्या सकाळी आपल्याकडे कोण आलं असावं? मी थोडेसे भीतभीतच दार उघडलं आणि दचकलेच. जवळ जवळ सहा फूट उंची, त्याला साजेलशी रुंदी, मोठा गोल पसरट चेहरा, झुबकेदार भरघोस मिशा, मोठे कपाळ आणि त्यावर भला मोठा गंधाचा टिळा. भेदक नजर. मळखाऊ गुडघ्याच्या जरा खाली येणारे धोतर. अंगरखा व त्यावर कोट आणि डोक्यावर लाल चौकटीचं मुंडासं. एखादा जुना पुराण पुरुष जणू अचानक सजीव होऊन माझ्या दाराच्या चौकटीत उभा आहे असं वाटलं.