Name of Book : ढगावरचं ऊन

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
’सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे’ असे म्हणतात. सुख हे महाग आहे. ते कधीतरी, काही काळच वाट्याला येतं आणि तेही अगदी गुंजभर. कारण महाग आहे ना म्हणून सोन्याच्या भावानं मिळत आणि दुःख मात्र पसा पसा पर्वताएवढं. जीवनात दुःखाचे डोंगर उभे राह्तात. त्यांना पार करुन आयुष्य जगायला लागतं. जे वाट्याला येईल, त्याला सामोरं जायला लागतं. संकटांशी सामना करावा लागतो. कधीतरी सुख आपल्या वाट्याला येणार आहे ह्या आशेवर माणूस जगत असतो आणि ते वाट्याला आले तर त्याला तो अत्तराच्या कुपी सारखे जपत राहतो ते उडून जाईल निसटुन जाईल म्हणुन.