Name of Book : पण ब्रम्हचर्य राहिले

Name of Author : चंद्रकांत महामिने

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 196

Synopsis :
फुगलेल्या शहरातला अरुंद रस्ता, अरुंद रस्त्यावरील लांब, रुंद वाहतूक अन्‌ तिच्यातून सुसाट पळणाऱ्या वाहन सुंदऱ्यांना भर रस्त्यात डोळा मारणारा सिग्नलचा खांब! खरं तर रस्त्यावरच्या वीज कंपनीच्या किंवा टेलिफोनच्या खांबाकडे कुत्रे वगळता इतर कुणाचे लक्ष जात नाही. पण या वाहतूक नियंत्रक खांबाच्या डोळा मारण्याच्या कृतीकडे रस्त्यावरच्या प्रत्येकाचे लक्ष असते. त्याने हरित नेत्र पल्लवी करावी यास्तव अवघ्या वाहनसुंदऱ्या उतावीळ झालेल्या असतात!