Name of Book : रंग अमेरिकेचे

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 178

Synopsis :
तुम्ही तुमच्या अमेरिका-भेटीत अतिशय डोळसपणे, अभ्यासू वृत्तीने आणि संवेदनशील मनाने इथूनच जग, इथला समाज न्याहाळलात. वृत्तपत्रातले लेख, वाचनालये, शाळा, पुस्तकं, अवती भवती दिसणारी माणसं... सगळ्या सगळ्यांचा तुम्ही एका निर्भर जिज्ञासू वृत्तीने अभ्यास केलात. एरवी भेटीला येणाऱ्यामध्ये जी आत्मसंतुष्ट आणि असमाधानी दिसते, ती तुमच्या लेखनात एका शब्दाने सुद्धा दिसत नाही. तुम्ही खरचं बरं वाईट, नवं-जुनं, धावणारं-थांबणारं, यशस्वी झालेलं-अयशस्वी झालेलं... सगळ्या तऱ्हेचं लोकजीवन पाहिलतं, वाचलतं, समजावून घेतलंत. आपल्या संस्कृतीचा, तत्वज्ञानाचा, परंपरेचा दिमाख न मिरवता दोन्हीकडच्या समाजाकडे शेवटी मानवी मूल्य आणि मानवी जीवन ह्याच डोळ्यांनी पाहिलंत. तुमची धावती, सुंदर भाषा, मधूनच येणारा हलकासा विनोद, तुमचे वाचनातले संदर्भ, दाखले, व्यक्तीगत अनुभव-ह्या सगळ्यामुळे हे लेख फार वाचनीय झाले आहेत.