Name of Book : कर्कोटक

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 228

Synopsis :
मोह अनेक असतात महाराज. मोह फक्त सुंदर देवयानीचा पडतो असं नाही. आणि मोहाला बळी पडणारे लोक आपल्या पराभवाला तत्वज्ञान चिकटवण्याचा प्रयत्न करतात. खरं तर कार्याकार्यविवेक हवा. माणसाला तो नसला की मोहाचे भुजंग आपलं कालकूट तुमच्यात ओतू शकतात. कार्य कोणतं? तू कशासाठी परदेशात, परलोकात गेलास ते विसरु नकोस. स्वर्गात देवांची अस्त्रे मिळवायला गेलेला अर्जुन उर्वशीच्या मोहात फसला नाही आणि विद्याहरणासाठी राक्षसांकडे रुप पालटून आलेला कच देवयानीच्या मोहात फसला नाही. कार्यावरची त्यांची नजर ढळली नाही. तुम्हाला पदवी घेण्यासाठी,उच्च शिक्षणासाठी, अनुभव घेण्यासाठी, अवलोकनासाठी, तरुण वयातच साहस करता येते. त्यासाठी किंवा अर्थाजनासाठी परदेशात गेलास ना? ठीक आहे. पण मग हे कार्य झालं की आता पुरे असं म्हणून तुम्ही माघारी फिरायला नको का? तुमची तुम्ही स्वतःसाठी लक्ष्मणरेषा ओढायला नको का?