Name of Book : दोन दोघी

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 118

Synopsis :
नुसतं ऎकून, वाचून ही अंगावर सरसरुन काटा येतो. अशा बालिकांची मुलींची भृणहत्या, पाच वर्षाखालील मुलांचा कुपोषणामुळे बळी. बिहार व इतर आसपासच्या आदिवासी गावातल्या ह्या बातम्या वाचून मन सून्न होऊन जातं. आज २१ व्या शतकात एकीकडे स्त्रियांची उन्नती शिगेला जाऊन पोहचलीय, आणि काही भागात हे दृश्य. आपल्याच आदिवासी भागातल्या बहिणींना ही वागणूक! निसर्गनियमाप्रमाणे हे विश्वचक्र अव्याहत चालू रहायला पुरुषांइतकीच स्त्रियांची पण आवश्यकता आहे. तरीही आज विज्ञानाची प्रगती(गर्भजल परीक्षा) मुलींच्या गर्भाच्या नाशाला कारणीभूत ठरलेली आहे. हळूहळू पाच पांडवांची द्रौपदी असं चित्र दिसण्याची वेळ आपल्यावर न येवो म्हणजे मिळवली.