Name of Book : समाजिक विकासाचे प्रश्न व धोरण

Name of Author : डॉ. शरदचंद्र गोखले

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 389

Synopsis :
आता मागे वळून पाहताना असे दिसते की, आजच्या भारतीय समाजापुढे असणारे प्रश्न हे पूर्वीच्या प्रश्नांपेक्षा अगदी वेगळे आहेत. आणि त्यांच्यासाठी धोरणांची आणखी शोधावयाची उत्तरेसुद्धा अगदी वेगळी आहेत. त्यामुळे ज्याला स्वतंत्र भारताचे सामाजिक प्रश्न अभ्यासायचे आहेत त्याला बालक कल्याणाचे पर्यायी धोरण, युवकांचे प्रश्न, वार्धक्याची कथा आणि व्यथा, झोपडपट्टीचे प्रश्न, गुन्हा आणि गुन्हेगारी, कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन, ग्रामीण अपंगांचे पुनर्वसन, बालमजुरी, या सामाजिक प्रश्नांचा मूळ संदर्भ म्हणून दारिद्र्याचा सामाजिक अन्वयार्थ समजून घ्यावा लागेल. मागासवर्ग आणि राखीव जागा ह्याविषयी नियोजकांना जसा नवा विचार करावा लागेल, त्याचप्रमाणे धोरणांच्या दृष्टीने जगाच्यापुढे असणारे भूक आणि संहार यांसारखे किंवा विकास या माध्यमांची भूमिका यांसारखे प्रश्न यांचाही विचार करावा लागेल. या विचारांतून समाज कल्याणाची, समाज विकासाची संकल्पना नव्या स्वरुपात प्रकट होईल अशी आशा आहे, हा विचार अधिक स्पष्ट व्हावा म्हणून सामाजिक विकासाचे प्रश्न आणि धोरण हे चिंतनात्मक पुस्तक लिहिण्याचा प्रपंच केला.