Name of Book : नारायण मूर्ती

Name of Author : रविंद्र कोल्हे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 129

Synopsis :
नारायण मूर्ती: एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सॉफ्टवेअर उद्योगाची त्यांनी या देशात मुहूर्तमेढ रोवली. देशातील बहुतेक उद्योजक जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करीत असताना मूर्ती यांनी जागतिकीकरणाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करुन घेतला. एक व्यक्ती म्हणूनही मूर्ती यांचे जीवन प्रेरणादायी आहे. डोक्याने उद्योजक आणि ह्रदयाने समाजवादी असलेल्या मूर्ती यांनी आपल्या उद्योगातील कर्मचाऱ्यांना भागधारक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजासाठी, विद्यार्थी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च करुन मूर्ती यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे. यशस्वी उद्योजक आणि करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक बनल्यानंतरही मूर्ती यांनी साधी राहणी सोडली नाही. समाजकार्यात महात्मा गांधींनी घालून दिलेले आदर्श औद्योगिक जीवनात जपले. तरुणांना दिशा देणारे विचार समजून घेण्यासाठी मूर्ती यांचे चरित्र मुळातूनच वाचायला हवे.