Name of Book : सफर बद्रीकेदार गंगोत्री-यमुनोत्रीची

Name of Author : वासंती घैसास

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
हिमालय म्हणजे सृष्टीदेवतेचं अनमोल भांडारच! विशाल पर्वतराजी, गगनभेदी पहाड, आकाशस्पर्शी हिमशिखरे, डोळे फिरवणाऱ्या दऱ्या, खळाळते निर्झर, जीवनदायिनी नद्या, अगाध हिम-जल प्रपात, तप्त पाण्याची कुंडं... हे सर्व भारावणारे रुपाविष्कार पाहण्या-अनुभवण्यासाठी करायला हव्यात हिमालयातील बद्री-केदार, गंगोत्री-यमुनोत्रीच्या निसर्गयात्रा. जगातील जीवन कलहाच्या हमरीतुमरीत मानाचे जिणे जगण्यास लागणारे धैर्य, साहस, आत्मविश्वास, कर्तृत्वाची धमक, इत्यादी गुणांचा ओनामा शिकविण्याची हिमालय ही एक शाळाच आहे. असं प्रतिपादन करणाऱ्या कै.शं.स.दाते यांच्या ’हिमालय दर्शन’ ग्रंथाच्या वाचनाने त्या तपोभूमीतील बद्री-केदार, गंगोत्री-यमुनोत्री या पूर्वापार यात्रा अधिक प्रगल्भतेने केल्या गेल्या. एके काळी अतिशय अवघड, कष्टप्रद, अशा मुख्यत्वे पायी कराव्या लागणाऱ्या अगाध हिमालयातील या चारधाम यात्रा आधुनिक सोयी, सुविधांमुळे सहजसाध्य, सुकर झाल्या आहेत.