Name of Book : दावून बोट त्याला

Name of Author : डॉ शरद कुलकर्णी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 211

Synopsis :
पहाटे पाचला गोविंदा बाहेर पडला. दोन दिवस सतत पाऊस पडल्यामुळे हवेत चांगलाच गारवा होता. अधून मधून काजवे चमकत होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बंगल्याच्या कंपाऊंडमधली फुलझाडं बहरली होती. त्यांचा मंद सुवास सगळीकडे पसरला होता. एका बंगल्याच्या बाजूला कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या प्राजक्ताच्या भल्यामोठ्या फांदीखाली फुलांचा सडा पडला होता. गोविंदानं अलगद फुलं वेचून हातातल्या छोट्याशा पिशवीत टाकली. गावाबाहेरच्या कर्णपुऱ्यातल्या देवीला फुलं वाहून डोळे मिटून हात जोडले. काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसून तो उठला, पुन्हा एकदा मंदिराच्या गाभाऱ्याकडे बघत त्याने हात जोडले अन्‌ तो झपाट्यानं निघाला.