Name of Book : मानिली आपुली

Name of Author : वैजयंती काळे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 208

Synopsis :
रावसाहेब चंदनला घेऊन शितोळेकडे आले, तेव्हा बंगल्यात जाण्याआधी शितोळेच्या ऑफिसात त्याने त्या दोघांचे स्वागत केले. शितोळे टेबलामागे त्यांच्या नेहमीच्या जागी बसले. त्यांच्यासमोरच्या खुर्च्यांपैकी एकीवर रावसाहेब आणि शेजारच्या खुर्चीवर चंदन बसू लागली. तिला थोपवीत शितोळे म्हणाले, :अं हं! इथे नको! मागे त्या भिंतीजवळच्या खुर्चीवर बस. त्या दिवशी बसली होतीस तशी!". एखाद्या षोडशेसारखी चंदन लाजली. त्यांच्या बोलण्याचे आवाज ऎकून बंगल्यातून शांताबाई तिथे आल्या. त्या दोघांकडे बघून प्रसन्न हसत म्हणाल्या, "बारा वर्षे झाली चंदनवन्संना इथून गेल्याला. पण यांच्याकडे बघून वाटतं, मध्ये काही काळ गेलाच नाही." "काहीतरीच वहिनी तुमचं!" चंदनने लटका निषेध केला. "नाही हो वहिनी! तुम्ही बरोबर बोललात. मलासुद्धा तसचं वाटतं!"