Name of Book : सांजतरंग

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 57

Synopsis :
अतिवृष्टी, पूर, महापूर म्हटले की पटकन डोळ्यासमोर उत्तर भारतातील आक्राळ- विक्राळ रुप धारण केलेल्या गंगा-जमुना, ब्रह्मपुत्रा, पुनपुन, घागरा आदी नद्या दिसू लागतात. महापुरांचे वरदान? (की शाप) या नद्यांनाच मिळालंय असं वाटतं. आपल्याकडील मांजरा, पूर्णा, शिवना, गोदावरी या नद्यांना महापूर ही काय चीज आहे हे जणू माहीतच नसावं, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, परंतु हे खरं नव्हे. आपल्याकडील नद्यांना महापूर अगदीच अपरिचित आहेत., असं नाही. खरी वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही वर्षापासून पाऊस सतत कमी होतोय! त्यामुळे दुष्काळ पडतोय. आपल्या मराठवाड्याची प्रमुख गोदावरी ही जीवनदायिनी नदीसुध्दा बालपण हरवून बसावं तशी महापूर हरवून बसलीय की, काय असं वाटतं; पण याच गोदावरीनं अगदी आतापर्यंत दरवर्षी येणारे महापूर अंगाखांद्यावर खेळ्वून दाखविले आहेत, हे किती जणांना माहीत आहे? अशा या गोदावरीच्या काठावरच माझं गाव आहे.